Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
आमदार चषक अंतर्गत पुरुष व महिला गटातील खुल्या कबड्डी सामन्यांना खेळाडू-क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार जयंतीनिमित्त बल्लारपूरमध्ये भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन बल्लारपूर - जिल्ह्यात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे युवकांना योग्य दिशा मिळत असून, क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. बल्लारपूर येथे आयोजित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार जयंतीनिमित्त बल्लारपूरमध्ये भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजनामुळे कबड्डी सारख्या देशी खेळांच्या माध्यमातून समाजात संघभावना, सामूहिकता, शिस्त व क्रीडावृत्ती निर्माण होत असून, क्रीडा स्पर्धा हे सामाजिक ऐक्य बळकट करणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर (ग्रामीण/शहर) व आमदार सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषक अंतर्गत भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि. २४, २५ व २६ जानेवारी रोजी बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्ड, सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र परिसरात पार पडलेल्या या स्पर्धांना खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुरुष गटातील २० तर महिला गटातील १० संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धांना चुरशीचे स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, कबड्डी स्पर्धेचे आयोजक श्रीकांत आंबेकर, समीर केने, निलेश खरबडे, काशीनाथ सिंग, मनीष पांडे, मुन्ना ठाकूर, गोगी दारी, राजू अंचूरी, संजय मोप्पिडवार, प्रकाश दोतपल्ली, राकेश सिंग, ब्रिजभूषण पाझारे, सचिन कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे युवकांना योग्य दिशा मिळत असून, क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना दर्जेदार मैदान, प्रशिक्षण व स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होत आहे. क्रीडेमुळे युवकांमध्ये शिस्त, चिकाटी, सांघिक भावना व सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होत असून, समाजघडणीमध्ये क्रीडा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: