The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

News Image

मुंबई, दि. 29 : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वनक्षेत्रातील जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ सभागृहात जिवती तालुक्यातील वनपट्ट्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिवती तालुक्यातील अनेक गावांची नोंद महसूल अभिलेखात गाव म्हणून असली, तरी वन विभागाच्या नोंदीत ती राखीव वनक्षेत्र म्हणून असल्याने अनेक शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा, पीएम-किसान योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 1980 पूर्वीच्या जमिनींसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्या वनक्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया तुलनेने सुलभ आहे. मात्र, 1980 नंतरच्या जमिनींसाठी वनसंवर्धन कायद्यानुसार स्वतंत्र मंजुरी आवश्यक असल्याने अनेक प्रस्ताव कागदपत्रांच्या अभावामुळे प्रलंबित किंवा नामंजूर होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचे तसेच संबंधित गावांचे सर्वेक्षण करून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

डिजिटल सातबारा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना ऑफलाइन सातबारा उपलब्ध करून देत पीएम-किसान योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

तेलंगणा सीमेलगतच्या जिवती तालुक्यातील 15 गावांमधील शेतजमिनींचे हक्क निश्चित करून सातबारा अभिलेखात समाविष्ट करण्याबाबत विभागीय आयुक्तांच्या समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय घरकुल योजना, बसस्थानक, सिंचन तलाव, नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामे तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतही तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच तालुक्यात कोतवाल पदांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीत आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील वनजमिनींचा प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.