The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.

News Image

आमदर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या आरोग्य शिक्षणाला नवी दिशा.

आमदार मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे सातत्याने केला होता पाठपुरावा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

चंद्रपूर येथील कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होणार शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना; १०० विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता.

चंद्रपूर : चंद्रपूर येथे शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रवेश क्षमतेचे शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने चंद्रपूर येथे शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. शासनाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असून, या महाविद्यालयाला १०० विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता असणार आहे. त्यामुळे चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. तसेच जिल्ह्यात प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून आरोग्य सेवेलाही मोठी बळकटी मिळणार आहे.

 

या निर्णयामुळे चंद्रपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयामुळे आरोग्य शिक्षणाची पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, प्रशिक्षित परिचारिका तयार करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवस्था बळकट होईल. परिणामी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाही मोठी ताकद मिळणार आहे.

 

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे. तसेच जिल्ह्यात प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.