The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

दालमिया सिमेंट कंपनीतील अपघातप्रकरणी जखमी कामगारांना २५ लाखांची मदत द्या : आमदार सुधीर मुनगंटीवार.

News Image
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची लक्षवेधी सूचनेतून वेधले सभागृहाचे लक्ष.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या कामगार अपघातांवर नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्याची मागणी.
 
कामगार सुरक्षेसाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याचे आणि अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मंत्री फुंडकर यांचे आश्वासन.
 
अधिवेशनानंतर मंत्री फुंडकर घेणार चंद्रपुरात बैठक. चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिड टँकर लोडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके हे दोन कामगार जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत जखमी कामगारांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या कामगार अपघातांबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे भूमिका मांडली. लक्षवेधी मांडताना आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, दालमिया सिमेंट कंपनीमध्ये झालेल्या अ‍ॅसिड अपघातात जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराची जबाबदारी कंपनीने घ्यावी आणि त्यांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २५ कामगारांचा अपघाती मृत्यू होतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे,असे नमूद केले. आ. मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, कामगारांच्या अपघातांबाबत अनेकदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. अनेक घटनांमध्ये आजपर्यंत कोणालाही शिक्षा झाल्याचे दिसून येत नाही. न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अशा प्रकरणांना न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विद्यमान कामगार कायद्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे.यासाठी आमदारांची एक समिती स्थापन करून या विषयाचा सर्वंकष अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली. दालमिया सिमेंटमध्ये जखमी झालेल्या कामगारांची विचारपूस करण्यासाठी कंपनीचे अधिकारी रुग्णालयातही गेले नसल्याची बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या कामगार अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व स्थानिक आमदारांची संयुक्त समिती स्थापन करावी आणि या संदर्भात शासनाने तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणीही आ.मुनगंटीवार यांनी केली. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की,  दालमिया सिमेंट लिमिटेडमध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिड टँकर लोडिंग प्रक्रियेदरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके व स्वाती उईके हे कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर जखमी कामगारांना कंपनीकडून जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले. तसेच कामगारांच्या सुरक्षितते संदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याचे आणि चंद्रपूरमध्ये अधिवेशनानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.