The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी रिंगरोड आणि उड्डाणपूलाची गरज; आमदार किशोर जोरगेवार.

News Image

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी.

 चंद्रपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांचा वाढता ताण आणि सातत्याने घडणारे भीषण अपघात रोखण्यासाठी ‘पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ दरम्यान स्वतंत्र रिंगरोड बायपास रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प येथील आर.ओ.बी. (MEL) रेल्वे लाईनपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नागपूर येथे झालेल्या भेटीत आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील वाहतूक समस्यांची सविस्तर माहिती देत तातडीने रिंगरोडसाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, चंद्रपूर हे कोळसा, लोहखनिज, सिमेंट आणि विविध औद्योगिक उपक्रमांमुळे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे शहर बनले आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि शेजारील तेलंगणा राज्याला जोडणारे केंद्र असल्याने शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. मात्र NH-930 आणि NH-930D या राष्ट्रीय महामार्गांना शहराबाहेरून जोडणारा स्वतंत्र पर्यायी मार्ग नसल्याने सर्व वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातूनच होत आहे. सध्या बल्लारपूर बायपास रोड, बंगाली कॅम्प, रामनगर चौक, वरोरा नाका ते पडोली या मार्गांवर दररोज हजारो अवजड वाहने धावत असल्याने शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रस्तावित रिंगरोडमुळे कोळसा, लोखंड व इतर खनिज वाहतूक करणारी अवजड वाहने शहरात प्रवेश न करता थेट बाहेरील मार्गाने जाऊ शकतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच वायू व ध्वनी प्रदूषणातही मोठी घट होईल, असा विश्वास आ. जोरगेवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूर शहराच्या भविष्यातील दृष्टीने हा रिंगरोड अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. * पडोली चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी चंद्रपूर शहराच्या विकासासाठी पडोली चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. वाढत्या वाहतुकीमुळे या चौकात सातत्याने कोंडी होत असून भविष्यातील गरजा लक्षात घेता पुलाचे बांधकाम अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प येथील आर.ओ.बी.(MEL) रेल्वे लाईनपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. * ८ लेन महामार्ग, ट्रान्सपोर्ट हब व उंच पुलाची मागणी नागपूर राज्य महामार्ग (MSH-9) हा सध्या चार पदरी असून औद्योगिक विस्तार आणि वाढत्या मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता या महामार्गाचे किंवा पदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. याशिवाय केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत बागला चौक ते बल्लारपूर महामार्ग (NH-930D) पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच वर्धा नदीवरील धानोरा येथे अत्यावश्यक उंच पुलाचे बांधकाम मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक विस्कळीत होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, चंद्रपूर येथे आधुनिक आणि सर्वसमावेशक ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात यावा, अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.