The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी राज्यातील विधानसभा निवडणुकांतील भाजपा महायुतीच्या दणदणीत विजयाने चंद्रपुरात जल्लोष.

News Image

गिरनार चौक भगवामय; फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटप आणि जोरदार घोषणाबाजी.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजय उत्सव साजरा.

चंद्रपूर- पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीने मिळविलेल्या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाचा आनंद चंद्रपूर शहरात उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार शहरातील गिरनार चौक येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत विजयाचा जल्लोष केला. संपूर्ण परिसर “भारत माता की जय”, “जय श्रीराम” आणि भाजपाच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपा महायुतीच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीताताई खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विजय उत्सव पार पडला.

जनतेने विकास, सुशासन, राष्ट्रवाद आणि देशगौरवाचे प्रतीक ठरलेल्या देशगौरव पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत भाजपा महायुतीला भरघोस समर्थन दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीने नोंदविलेल्या अभूतपूर्व विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विकासाभिमुख विचार, राष्ट्रहित आणि सक्षम नेतृत्वाला जनतेने दिलेल्या कौलाचा आनंद कार्यकर्त्यांनी जल्लोषातून व्यक्त केला. फटाक्यांची दणदणीत आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी आणि पेढे वाटपामुळे गिरनार चौक परिसर भगवामय झाला असून, संपूर्ण वातावरण विजयाच्या उत्साहाने भारावून गेले होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.