The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

विकासकामांच्या जोरावर चंद्रपूर महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Image

माता महाकालीच्या आशीर्वादाने महायुतीचा महाविजय निश्चित – मुख्यमंत्री

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय संकल्प यात्रा

 चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत विविध विकासकामे झाली असून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनउपयोगी योजना आम्ही येथे यशस्वीपणे राबवित आहोत. आता १६ हजार घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय झाला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आजच्या या विजय संकल्प यात्रेतून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि माता महाकालीच्या दर्शनाने चंद्रपूर महानगरपालिकेत महाविजय मिळणार असून येथे महायुतीचा झेंडा फडकेल , असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प यात्रा काढण्यात आली. अंचलेश्वर गेट येथून निघालेल्या संकल्प यात्रेचा जटपूरा गेट येथे समारोप करण्यात आला. येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, जिल्हाप्रमुख अॅड. युवराज धानोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जात आहे. चंद्रपूर शहरात मागील काही काळात हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात विकास झाला आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली आणि पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी मोठा निधी आपण मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्याची योजना, भुयारी गटार योजना, रस्ते योजना, सुशोभीकरण योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आपण या शहराचा सर्वसमावेशक विकास केला आहे. पुढेही ही विकासाची गाडी याच गतीने सुरू ठेवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेत पारदर्शक सत्ता असणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी ५० हजार कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. यात चंद्रपूर शहरालाही निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्यरीत्या वापर व्हावा यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. १५ तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देत चंद्रपूरच्या विकासाला अधिक गतीशील करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री यांनी महाकालीचे दर्शन घेत फोडला प्रचाराचा नारळ

 राज्यभरात आजपासून सर्वच महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत

 अंचलेश्वर गेटजवळून निघालेल्या विजय संकल्प यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी अंचलेश्वर गेट येथे बेलदार समाज, ख्रिश्चन समाजाच्या वतीने पटेल हायस्कूल, सुदर्शन समाजाच्या वतीने छोटा बाजार चौक, मादगी समाजाच्या वतीने हसन इलेक्ट्रिक, क्षत्रिय राजाभोस बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वसंत भवन, उत्तर भारतीय ब्राह्मण समाजाच्या वतीने लक्ष्मी नारायण मंदिर, फुलमाळी समाजाच्या वतीने चंद्रहास लॉज, खैरे कुणबी समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई समाजाच्या वतीने छोटा बाजार, सुतार समाजाच्या वतीने श्री संतोषी माता मंदिर, बंगाली समाज संघटनेच्या वतीने आराधना ड्रेसेस, शिवभोजन संघटनेच्या वतीने अंचलेश्वर गेट, गुरुदेव सेवा समितीच्या वतीने गोपाल ट्रेडर्स, तेली समाजाच्या वतीने जटपूरा गेट, अनुसूचित जाती समाज संघटनेच्या वतीने अंचलेश्वर गेट, आदिवासी समाजाच्या वतीने गिरनार चौक, बोहरा समाजाच्या वतीने चांडक मेडिकल, आदिम माना समाजाच्या वतीने गांधी चौक, हलबा समाजाच्या वतीने पटेल हायस्कूल, मातंग समाजाच्या वतीने आंबेडकर चौक, महात्मा ज्योतिबा फुले आयोजन समितीच्या वतीने जटपूरा गेट येथे मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.