The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्गाला उत्साहात प्रारंभ.

News Image

विचार, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या बळकटीकरणाचा संकल्प — विविध मान्यवरांचे मार्गदर्शन.

चंद्रपूर : भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर जिल्हा महानगरतर्फे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पक्षाची विचारधारा अधिक सक्षमपणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक व नेतृत्वक्षमतेचा विकास घडविणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बोर्डा येथे आयोजित या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सोहळ्याला चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रभारी अर्चनाताई डेहनकर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, अशोक जिवतोडे, वर्ग प्रमुख तथा महामंत्री रविंद्र गुरुनुले, माजी महापौर अंजली घोटेकर, तुषार सोम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षण वर्गात पहिल्या सत्रात "कार्यकर्ता विकास, सांभाळ व अपेक्षा" या विषयावर मार्गदर्शन करताना हंसराज अहिर यांनी कार्यकर्त्यांनाच पक्षाची खरी शक्ती असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी समाजाशी सातत्याने संवाद ठेवत संघटन विस्तार, जनसंपर्क आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या नेतृत्व विकासावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर शिवरायजी कुलकर्णी यांनी "वैचारिक अधिष्ठान" या विषयावर मार्गदर्शन करत भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा मूलभूत पाया उलगडून सांगितला. राष्ट्रहित, सामाजिक समरसता, अंत्योदय आणि राष्ट्रसेवा हीच भारतीय जनता पक्षाची विचारधारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ते वैचारिकदृष्ट्या सक्षम असतील तर संघटन अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण वर्गात आगामी सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटनाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनविण्यासाठी विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी "देशासमोरील सामाजिक व आंतरिक आव्हाने", प्रा. अनिल सोले यांनी "आपला इतिहास विकास" तर श्रीकांत देशपांडे यांनी "विचार परिवार" या विषयांवर मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात सुमित मिश्रा यांनी सोशल मीडिया, नमो ॲप व सरल ॲप याबाबत माहिती दिली, तर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यावहारिक सत्राद्वारे कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष कामकाज आणि संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन केले.या सत्रांना अध्यक्ष म्हणून प्रकाश देवतळे, सतीवा दंढारे आणि नामदेव डाहुले यांची उपस्थिती लाभली. प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांना नवऊर्जा, नवी दिशा आणि अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.