The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

संत जगनाडे महाराजांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांमध्ये समाज परिवर्तनाची ऊर्जा.

News Image

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

बुरकोनी येथे श्री संताजी जगनाडे महाराज अभ्यासिकेचे लोकार्पण

पालकमंत्री असताना वर्धा जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लाभली हे माझे भाग्य

हिंगणघाट - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री संत जगनाडे महाराजांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांमध्ये समाज परिवर्तनाची ऊर्जा असल्याचे प्रतिपादन केले. संत जगनाडे महाराजांच्या नावाने निर्माण करण्यात आलेली अभ्यासिका ही केवळ सिमेंट आणि माती-विटांनी तयार झालेली इमारत नसून, गरीब व वंचित घटकांच्या उन्नतीसह विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करणारे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही आमदार श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात बुरकोनी येथे उभारण्यात आलेल्या श्री संताजी जगनाडे महाराजांच्या अभ्यासिकेचे लोकार्पण आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार रामदासजी तडस, हिंगणघाटचे आमदार समीरजी कुणावार, माजी आमदार राजूभाऊ तीमाडे, मिलिंद भेंडे, उमेश आष्टनकर, विनोद विटाळे, प्रवीण हिवरे, आकाश पोहाणे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, विशाल निंबाळकर,अंकूश ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचेही लोकार्पण झाले.

या गावात श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाची अभ्यासिका निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले, याचा आनंद आहे. एकतेचा आणि मानवतेचा विचार रुजवणारी ही अभ्यासिका ठरेल, असा विश्वास असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले. ‘संत जगनाडे महाराजांनी बुडणारे अभंग बाहेर काढले, तसे आपल्याला देखील समाजाला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढायचे आहे. शेवटच्या माणसाच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार करायचा आहे. या अभ्यासिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारे साहित्य, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे साहित्य असले पाहिजे. याठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके उपलब्ध करून द्या. लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके इथे असली पाहिजे,’ अशी अपेक्षाही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे, प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे. धर्म म्हणजे स्टेट हाय-वे आणि संताजी जगनाडे महाराजांनी सांगितलेला मानवतेचा धर्म म्हणजे नॅशनल हाय-वे आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लाभली. महात्मा गांधींच्या कर्मभूमीतील या जिल्ह्याने जे-जे मागितले, ते देण्यासाठी कायम प्रयत्न केला. आ. समीर कुणावार यांच्या मागणीनुसार हिंगणघाटसाठी ५० कोटी आणि आर्वीसाठी २५ कोटी निधी दिला. यासोबतच वर्धा शहरासाठी १०० कोटींचा निधी देण्याचे भाग्य लाभले. वर्धा जिल्ह्याची सेवा करताना कधीही हात आखुडता घेतला नाही. शब्द दिला तो पूर्ण केला. आयोजकांनी मांडलेल्या मागण्यांसाठीही आम्ही पूर्ण शक्तीने सोबत आहोत,’ असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन द्यालाडकी बहीण केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. तिच्यामध्ये सर्वाधिक सहनशीलता आहे आणि तेवढीच शक्ती देखील तिच्यामध्ये आहे. या शक्तीला उद्योजकतेची जोड दिली तर कुटुंबाचा गाडा सहज पुढे नेऊ शकते. लाडक्या बहीण अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊ शकतात, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

संत जगनाडे महाराजांचे टपाल तिकीटसंताजी जगनाडे महाराज यांचे टपाल तिकीट काढण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) जन्मस्थान तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही भाग्य मला लाभले, याचा विशेष आनंद आहे, अश्या भावनाही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.