The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल - आमदार किशोर जोरगेवार.

News Image

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी आमदार किशोर जोरगेवार, यजुर्वेद महाजन, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अम्मा की पढ़ाई फाउंडेशनचे चंदू वासाडे, नामदेव डाहुले, महामंत्री सविता दंढारे, रविंद्र गुरनुले, वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, नगरसेविका सविता कांबळे, सरला कुळसंगे, आशा देशमुख, शीतल गुरनुले, नगरसेवक जितेश कुळमेथे, वंदना तिखे, अरुण तिखे, निलेश बेलखेडे, संजय बुरघाटे, सुमित बेले, प्रलय मशाखेत्री आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय वक्ते, महाराष्ट्रियन ऑफ द इयर पुरस्कार 2025 सन्मानित तसेच राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समिती, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार यांचे सदस्य यजुर्वेद महाजन उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश मिळवण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. त्यासाठी जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करून ज्ञान मिळवा, वेळेचे व्यवस्थापन शिका आणि अपयशाला घाबरू नका. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता आहे, असे ते यावेळी म्हणाले.यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी हे केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे भविष्य आहेत.

स्थानिक विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव होताना पाहणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि संधी मिळावी यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा आणि चंद्रपूरचा झेंडा उंचावणाऱ्या डॉ. प्राजक्ता आस्वार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच डॉ. प्राजक्ता आस्वार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनामुळे नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी आणि पालकवर्गाची उपस्थिती होती.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.