The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पराभव दिसू लागल्याने उबाठा आणि काँग्रेसकडून खोट्या आरोपांचे राजकारण – सुभाष कासनगोट्टूवार

News Image

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव अटळ दिसू लागल्याने काँग्रेस आणि उबाठा कडून भाजपविरोधात खोट्या आरोपांचे राजकारण सुरू झाले आहे. खोट्या स्वाक्षरीचे पट्टे वाटप केल्याचा आरोप हा पूर्णतः निराधार, दिशाभूल करणारा आणि केवळ राजकीय सूडबुद्धीतून प्रेरित असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी केला आहे. पट्टे वाटप करण्याचा अधिकार हा केवळ जिल्हाधिकाऱ्यांचा असून, भाजपने किंवा कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याने पट्टे वाटप केले असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. नागरिकांनी पट्ट्यासाठी सादर केलेल्या अर्जांची रिसिव्ह कॉपी नागरिकांना देण्यात आली आहे. ती पट्टा नसून अर्जाची पावती आहे, हे माहिती असूनही काँग्रेस आणि उबाठा जाणीवपूर्वक अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजना विरोधात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता गरीब व गरजू नागरिकांच्या हक्कांच्या पट्ट्यांवरही राजकारण सुरू केले आहे. जनतेला विकासाऐवजी भीती आणि संभ्रम निर्माण करून मतदानावर परिणाम करण्याचा हा हतबल प्रयत्न असल्याची टीकाही कासनगोट्टूवार यांनी केली. काँग्रेस नेमका कोणता कागद ‘पट्टा’ असल्याचे सांगत आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करताना भाजपची प्रतिमा मलिन करण्याच्या या कटाविरोधात मानहाणीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. भाजप विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असताना, काँग्रेस मात्र खोट्या आरोपांच्या आधारावर राजकीय अस्तित्व वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.