The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्कंडा देवस्थानाची विकासकामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे निर्देश.

News Image
१४.८५ कोटींच्या कामांसाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याच्या सूचना. राज्यमंत्री श्री. आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन. आमदार मुनगंटीवार यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना.  
 
मुंबई - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा (मार्कंडेश्वर) शिवमंदिराच्या संवर्धन व परिसर विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. ही विकासकामे मिशन मोडवर राबवून २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. या संदर्भात मंत्रालयात वित्त राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाचा विकास मिशन मोडवर करण्याची गरज अधोरेखित केली.राज्य पुरातत्व विभाग व जिल्हा नियोजन समितीमार्फत विदर्भातील संरक्षित स्मारके, ऐतिहासिक स्थळे, स्मृतिचिन्हे, मंदिरे तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मंजूर १४ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या कामांची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी विदर्भातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या संदर्भात मंत्रालयात मा. वित्त राज्यमंत्री श्री. आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाचा विकास मिशन मोडवर करण्याची गरज अधोरेखित केली. कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ही समिती दर आठवड्याला प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा आढावा घेणार आहे. तसेच केंद्रीय पर्यटन मंत्री मा. ना. श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांना गडचिरोलीतील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी निमंत्रित करण्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. देवस्थान परिसरातील १०० मीटर व ३० मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम अथवा अतिक्रमण होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली यांनी स्थानिक ग्रामसेवकांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय, विकासकामे दोन टप्प्यांत होणार असताना दुसऱ्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यता व निधी मागणीसाठी झालेल्या तीन वर्षांच्या विलंबाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला या बैठकीत देण्यात आले. बैठकीत मंदिराच्या जतनासाठी शास्त्रशुद्ध पुनर्निर्माण, प्राचीन वास्तूशैलीचे संवर्धन, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. श्री मार्कंडा शिव मंदिराचा विकास हा केवळ धार्मिक स्थळापुरता मर्यादित नसून गडचिरोलीच्या सांस्कृतिक ओळखीला बळकटी देणारा आणि पर्यटनवृद्धीस चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.