The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

श्री माता महाकाली मंदिर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न.

News Image

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर व श्री महाकाली माता महोत्सव समीतीची आयोजन .

 चंद्रपूर शहराची आराध्य दैवत श्री माता महाकाली मंदिर येथे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणा तसेच त्यांना निरोगी, दीर्घ व यशस्वी आयुष्य लाभावे यासाठी विशेष महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगर आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्थानिक भजन मंडळांनी सादर केलेल्या देवी स्तुती, अभंग आणि गजरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. जय माता महाकाली च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर माता महाकालीची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. पुजार्यांनी वेदमंत्रोच्चारात देवीसमोर दीप प्रज्वलित करून आमदार किशोर जोरगेवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत राहावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि ते जनतेची सेवा अधिक जोमाने करू शकावेत, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. आरतीच्या वेळी मंदिरातील दिव्यांच्या प्रकाशात आणि घंटानादात निर्माण झालेल्या पवित्र वातावरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. अनेकांनी आरतीत सहभागी होत आमदारांच्या आरोग्यासोबतच शहराच्या प्रगतीसाठीही प्रार्थना केली. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिला मंडळे, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.