The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मॉर्निंग वॉकदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांचा नागरिकांशी थेट संवाद

News Image

बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात नागरिकांच्या भेटी.

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत आज सकाळी बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात मॉर्निंग वॉक करताना नागरिकांशी थेट संवाद साधला. रोजच्या दिनक्रमाचा भाग म्हणून फिरायला आलेल्या नागरिकांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या.यावेळी उद्यानात फिरणार्या ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच व्यायामप्रेमींशी आमदार जोरगेवार यांनी आत्मीयतेने संवाद साधला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, घरपट्टे तसेच परिसरातील मूलभूत नागरी प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली. आमदार जोरगेवार यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकार्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ सभा, पदयात्रा किंवा प्रचारापुरते न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला संवाद महत्त्वाचा असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. जनतेशी थेट संपर्क हाच विकासाचा खरा आधार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नागरिकांशी सकाळच्या प्रसन्न वातावरणात झालेला हा संवाद अनेकांसाठी सुखद अनुभव ठरला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सहज, साध्या आणि लोकाभिमुख वागणुकीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा थेट संपर्कातून जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र या भेटीतून स्पष्ट झाले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.