The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरकरांचे हक्काच्या घरांचे स्वप्न होणार साकार. २००४ घरांसाठी सुमारे २३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी.

News Image
आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; पहिल्या टप्प्यात गरीबांसाठी घरकुल योजना साकार होण्याच्या मार्गावर चंद्रपूरकरांनी मानले आमदार मुनगंटीवार यांचे आभार.
 
  चंद्रपूर : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आता चंद्रपूरकरांचे हक्काच्या घराचे स्वप्नही साकार होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता मोठे यश मिळाले आहे. नवीन चंद्रपूर (म्हाडा कॉलनी) परिसरात गरिबांसाठी उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनंतर्गत २३० कोटी रुपयांच्या २००४ घरांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वीच १० हजार घरकुल प्रकल्पाची संकल्पना मांडत, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी पुढाकार घेतला होता. याच अनुषंगाने त्यांनी राज्यमंत्री पंकज भोयर तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेऊन या योजनेला गती दिली होती. या सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुराव्याचा परिपाक म्हणूनच पहिल्या टप्प्यातील २००४ घरांना मंजुरी मिळाली असून, येत्या काळात उर्वरित घरकुल प्रकल्पालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या निर्णयामुळे चंद्रपूर शहरातील गरजू व मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, “प्रत्येकाला स्वतःचे घर” हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या या मंजुरीनंतर चंद्रपूरकरांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानत, त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चंद्रपूरचा सुसज्ज व सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस पुढाकार घेत गायत्री शक्तिपीठ परिसराची पाहणी करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले. रस्ते चौपदरीकरण, पार्किंग व सौंदर्यकरणाचे नियोजन करण्यात आले असून, म्हाडाच्या जागेत ऑक्सिजन पार्क, गार्डन व नागरिकांसाठी सुविधा उभारण्याची योजना आहे. तसेच पोलिस गृहनिर्माण व प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, नागपूर रोड ते देवाडा शिव ३० मीटर रस्त्याच्या प्रस्तावाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवीन चंद्रपूरसाठी आग्रही नवीन चंद्रपूर  घडविण्याच्या ध्येयाने आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने आग्रही आहे. शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर ठोस पुढाकार घेतला आहे. पायाभूत सुविधा, सुशोभीकरण, स्वच्छता, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, तसेच सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांनी केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने पाठपुरावा करत यश मिळवले आहे. यामुळे विकासाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करत चंद्रपूरला आधुनिक, सुबक आणि नागरिकांसाठी अधिक सुसज्ज शहर बनवण्याचा त्यांचा दृष्टिकोन ठळकपणे दिसून येतो. त्यांच्या या आग्रही भूमिकेमुळेच अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळत असून, ‘नवीन चंद्रपूर’च्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार मिळत आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.