The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आमदारकिशोर जोरगेवार.

News Image

आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना.

विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून बाबूपेठ येथील महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.यावेळी तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, अमोल नालमवार, सद्गुरू व्यासम प्रसारक मंडळाचे लोकेश बोरकर, प्रवीण ईटनकर, मनोज टिकले, राकेश पायपरे, पुंडलिक मेश्राम, गंगाधर बावणे, राजू येरणे, प्रवीण नागरकर, मोरेश्वर टिकले, सुनील रागीट, अशोक पेटकर, वेदांत अलमस्त यांच्यासह बाबूपेठ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबूपेठसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शहरातील इतर भागात जावे लागत होते.

ही अडचण लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसरात सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला होता. आता ही अभ्यासिका अंतिम टप्प्यात असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.यावेळी पाहणीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

विशेषतः वातानुकूलित व्यवस्था, संगणक सुविधा, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळेल यासाठी आवश्यक अनुषंगिक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आ. जोरगेवार यांनी शिक्षण क्षेत्रात दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.

ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरातील मोठ्या अभ्यासिकांप्रमाणे सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ही अभ्यासिका सुरू झाल्यानंतर बाबूपेठ व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून अभ्यासासाठी दूरवर जाण्याची गरजही टळणार आहे. तसेच सदर इमारत दोन मजली असून तळमजल्यावर व्यायामशाळा असणार आहे. यात महिलांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.