The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

अरुन लाखानी यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महाकाली मातेचे घेतले दर्शन.

News Image

माता महाकाली पुजा अर्चना कार्यक्रमात दर्शविली उपस्थिती.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अरुण लाखानी यांचे चंद्रपुरात प्रथमच आगमन झाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पूजा-अर्चना कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहून श्री महाकाली मातेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ विभागाचे संघटन प्रमुख डॉ. उपेंद्र कोटेकर, आमदार करण देवतळे, नोंदणी प्रभारी सुधीर दिवे, तुषार सोम, बलराम डोडाणी, मनपा गट नेते चंद्रशेखर शेट्टी, यांच्या सह सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची आदिंची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीही अरुण लाखानी यांनी महाकाली मातेचे दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद मागितले होते. बिनविरोध निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा चंद्रपुरात येत त्यांनी महाकाली मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले आणि देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने श्री महाकाली मंदिरात विशेष पूजा-अर्चनेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेतील यशस्वी वाटचालीसाठी यावेळी महाकाली मातेच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली.

या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करत त्यांच्या निवडीमुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्रभावीपणे विधान परिषदेत मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लाखानी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अरुण लाखानी यांनी महाकाली मातेच्या आशीर्वादामुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासह कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे ही संधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामांना गती देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे, हेच आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.