The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न.

News Image

चंद्रपूर : आगामी महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालपेठ येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठे व प्राचीन अशी ओळख असलेल्या महाशिवलिंग मंदिरात नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी मनीष महाराज, महानगर पालिका अधिकारी, मंदिर कमिटीचे सदस्य आणि भगतांची उपस्थिती होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसुविधांचा विचार करून स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहतूक नियोजन तसेच इतर मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सविस्तर आणि काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी दिले. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला. चंद्रपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीसह विविध धार्मिक सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये महाशिवरात्रीचा सण विशेष महत्त्वाचा असून दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शिव मंदिरात दर्शनासाठी येतात. ही परंपरा अधिक सुस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी नियोजन बैठक महत्त्वाची ठरली. या नियोजन बैठकीस मंदिर समितीचे पदाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.