The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात भव्य बाईक रॅलीबाईक रॅलीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबाविकास, सेवा आणि विश्वास या संदेशासह हजारोंच्या उपस्थितीत प्रचार रॅली

News Image

चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शहरातील चार प्रमुख प्रभागांमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महाकाली प्रभाग क्र. १२, भानापेठ प्रभाग क्र. ११, जटपुरा प्रभाग क्र. ७ आणि इडंस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ या भागांत काढण्यात आलेल्या या रॅलीला  महिला, पुरुष ,युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही रॅली म्हणजे चंद्रपूरकरांचा भाजपा महायुतीवरील दृढ विश्वास आणि उमेदवारांच्या विजयाची चाहूल असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.महाकाली प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपा–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार प्रज्वलंत प्रमोद कडू, पुष्पा वामन दहागावकर, अविता चंद्रशेखर लडके व राजेंद्र सुधाकर शास्त्रकार यांच्या समर्थनार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही रॅली रजा चौक, जोडदेऊळ मंदिर रोड, धोबी चौक, सुदर्शन चौक, कोहिनूर ग्राउंड मार्गे अंचलेश्वर गेट येथे येऊन संपन्न झाली.

भानापेठ वार्ड प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपा–शिवसेना–आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार श्री. सुरज पेदुलवार, श्रीमती माला पेंदाम, सौ. आशा आबोजवार व श्री. संजय कंचर्लावार यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. तसेच जटपुरा वार्ड प्रभाग क्र. ७ मध्ये छबुताई मनोज वैरागडे, भाग्यश्री दिगंबर हांडे, श्री. प्रमोद कवडूजी क्षिरसागर व श्री. रवि लोणकर यांच्या समर्थनार्थ ही बाईक रॅली काढण्यात आली.सदर रॅली अंचलेश्वर गेट येथून सुरज पेदुलवार यांच्या कार्यालयापर्यंत, त्यानंतर संजय कंचर्लावार यांचे कार्यालय, जटपुरा गेट, गणेश मंदिर, सवारी बंगला (नगीना बाग), संविधान चौक, जनार्दन मेडिकल चौक, शिवजी हॉस्पिटल मार्गे खंजर मोहल्ला येथे येऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाजवळ रॅलीची सांगता झाली.या बाईक रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘विकास, सेवा आणि विश्वास’ या संदेशासह शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. विकासाभिमुख विचारधारेचे भाजपा महायुतीचे उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण, समतोल व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून, चंद्रपूर शहराला भक्कम मूलभूत सुविधा आणि प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत कमळाच्या चिन्हासमोर मतदान करून भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे ठाम आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

इडंस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपा -शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार सौ. राजलक्ष्मी सुधीर कारंगल, सौ सुनीता राधेश्याम जयस्वाल, महेश दशरथ झिटे, चंद्रशेखर उर्फ शेखर सुभाष शेट्टी यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बिरसा मुंडा चौक- उडिया मोहल्ला-दूधडेअरी चौक-बीएमटी चौक-आस्था चौक- इंडस्ट्रियल एरिया- आदर्श पेट्रोल पंप येथे रॅलीची सांगता झाली. भगवान बिरसा मुंडा यांना पुष्प अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘रेल्वे अतिक्रमणग्रस्त घरांचा प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावला असून, रस्ते, पूल, उद्याने, घरपट्टे, घरकुल योजना, स्वच्छ पाणी व सुसज्ज ड्रेनेजसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढेही आपल्या प्रभागाच्या व चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीने उभा आहे.’

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.