Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
“आरोग्य जनसंवाद ”या कार्यक्रमाला आमदार मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर,(का. प्र.) : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी व शासकीय आरोग्य सेवांमध्ये अधिक प्रभावी सुधारणा घडवून आणण्यासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता “आरोग्य जनसंवाद सत्राचे” आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा “आरोग्य जनसंवाद” उपक्रम राबविण्यात येणार असून शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांशी संबंधित समस्या, तक्रारी आणि सूचना नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत मांडता याव्यात, यासाठी हा संवादाचा प्रभावी मंच ठरणार आहे.
आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि उत्तरदायी व्हाव्यात, यासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
या जनसंवाद सत्रात आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहे. त्यासोबतच त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आवश्यक निर्देशही दिले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करत असून, त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी या “आरोग्य जनसंवाद सत्रात” मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या आरोग्यविषयक समस्या, तक्रारी, सूचना आणि अपेक्षा निर्भीडपणे मांडाव्यात, जेणेकरून त्या थेट प्रशासनाच्या निदर्शनास येऊन त्यावर प्रभावी व तातडीने कार्यवाही करता येईल, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: