The Patil News

Important Links

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur

मतदानाच्या दिवशी मतदार कामगारांना भरपगारी सुट्टी

Edited by: The Patil News Category: देश 13 Jan, 2026 12:48 PM
News Image

अपवादात्मक परिस्थितीत 2 ते 3 तासांची सवलत

चंद्रपूर,दि. 13 : चंद्रपुर महानगर पालिका क्षेत्रातील कामगार मतदारांना 15 जानेवारी 2026 रोजी त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. 1. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. 2. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील, (खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी होटल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.) 3. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा धोकादायक अधवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी 2 ते 3 तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील वर नमूद केल्यानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, अशी तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासकिय इमारत, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्षात किंवा assttcommrchd@gmail.com या मेलवर करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
ब्रेकिंग
🚨 ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 'The Patil News'... 🚨 आमच्या पोर्टलवर जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 9604938312... 🚨 बातम्यांचे सर्वात जलद अपडेट्स फक्त इथेच...