The Patil News
Important Links
Contact Us
thepatilnews@gmail.com
+91 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur
चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी च्या चंद्रपूर शहर कार्यकारिणी बांधणी तसेच विविध पदांच्या नियुक्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक दि. १० मे २०२५ रोजी PWD गेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. लाडे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी हे उपस्थित होते. बैठकीचे नियोजन शहराध्यक्ष इंजि. विमित कोसे यांनी केले असून बैठकीचे संचालन लोणारे साहेब (विधानसभा) यांनी केले.
शहर कार्यकारिणी नियुक्त्या
संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने खालील पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या :
कार्तिक वंकर — शहर महासचिव
प्रणित तोडे — शहर सचिव
प्रविण कांबळे — शहर सदस्य
शैलेशजी खोबरागडे — शहर सदस्य
विवेक दुपारे — कोषाध्यक्ष, शहर चंद्रपूर
झोन प्रभारी नियुक्ती
बाबूपेठ, लालपेठ व भिवापूर झोनची जबाबदारी खालीलप्रमाणे देण्यात आली :
किशोरभाऊ चिकटे — झोन प्रभारी
भोळाभाऊ दुधगावडी — झोन प्रभारी
विधानसभा स्तरावरील नियुक्ती
श्री. अजबराव मनोहर — विधानसभा सचिव
बैठकीचे आभार प्रदर्शन दादाजी धकाडे यांनी केले.
उपस्थित मान्यवर
या बैठकीस नवनंद खंडाडे (स्टार प्रचारक), नितेशभाऊ नरगडे (विधानसभा उपाध्यक्ष), अखिल निमगडे, आलोक बांबोडे, मारुती गेडाम साहेब, कांबळे साहेब तसेच इतर बहुसंख्य कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: